Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 11 वाजेपर्यंत सुमारे 20.99 % मतदान

एमपीसी न्यूज- कर्नाटकमध्ये आज (10 मे रोजी) विधानसभेसाठी ( Karnataka Election 2023) सकाळी 9 वाजेपर्यंत 8.26 टक्के मतदान झाले आहे तर 11 वाजेपर्यंत सुमारे 20.99 % मतदान झाले आहे.

 

 

या निवडणुकीसाठी राज्यभरातील एकूण 5,31,33,054 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या मतदारांमध्ये 2,67,28,053 पुरुष मतदार तर 2,64,00,074 महिला मतदार आहेत. तसेच 4,927  इतक्या संख्येने इतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदाना दरम्यान एकूण 75,603 बॅलेट युनिट (BU), 70,300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76,202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.

 

Pune : सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा -चंद्रकांत पाटील

 

दक्षिणेतील या महत्त्वाच्या राज्यात सत्तेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. कर्नाटकचे राजकारण  जातींभोवती प्रामुख्याने केंद्रित आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ( Karnataka Election 2023) ठरवणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.