PCMC : गणवेश खरेदीची दीड महिने अगोदरच तयारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गतवर्षी दिवाळीत गणेश व स्वेटर देण्यात आले होते. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश देण्यासाठी महापालिका प्रशासनाने दीड महिने अगोरदच या विषयाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीलाच विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या शहरात बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा असून यामध्ये सुमारे 51 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश व एक स्वेटर तसेच, इतर शालेय साहित्य दिले जाते. मात्र, आगामी शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना फक्त गणवेश देण्यात येणार असून शालेय साहित्यासाठी विद्यार्थी अथवा पालकांच्या बॅंक खात्यात पैसे टाकण्यात येणार आहेत म्हणजे (डीबीटी) करण्यात येणार आहे.

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 11 वाजेपर्यंत सुमारे 20.99 % मतदान

गतवर्षी डीबीटीच्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नाही. गणवेश देखील चार महिने उशिरा मिळाले. यंदा गणवेश देण्यासाठी महापालिका प्रशासनाने दीड महिने आधीच प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या कामासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती सहा वर्षांसाठी केली आहे. याबाबतचे करारनामे 2019 मध्ये रद्द करण्यात आले होते. याविरोधात ठेकेदार न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयाने मे. महालक्ष्मी ड्रेसर्स अँड टेलरिंग फर्म, वैष्णवी महिला कार्पोरेशन तसेच प्रेस्टीज गारमेंटस अँड टेलरिंग फर्म या संस्थांकडून गणवेश घेण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार, 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना या संस्थांकडून गणवेश घेण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी 22 कोटी 68 लाख 52 हजार इतकी तरतूद केली आहे. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाकडे शालेय विद्यार्थी गणवेश या लेखाशिर्षावर 5 कोटी 53 लाख रुपयांची तरतूद आहे. यामधून गणवेशासाठी  (PCMC) खर्च करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.