Shirgaon : उर्से टोल नाक्यावरून लोखंडी बार चोरणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज – उर्से टोल नाका येथून लोखंडी (Shirgaon) बार चोरणाऱ्या दोघांना शिरगाव पोलिसानी अटक केली आहे. हा प्रकार 8 मे रोजी उर्से टोलनाका येथे घडला होता.

शिवराज दशरथ सिंग (वय 20), योगेंद्र प्रल्हाद सिंग (वय 22 रा.बरखेडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.याप्रकऱणी शिरगाव पोलीस ठाण्यात राजेश रवीकुमार तातीनैनी (वय 31 रा.लोणावळा) यांनी मंगळवारी(दि.9) फिर्याद दिली आहे.

PCMC : गणवेश खरेदीची दीड महिने अगोदरच तयारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी उर्से टोल नाका येथून 86 हजार 332 रुपयांचे 4 किलो वजनाचे 340 लोखंडी डबल बार चोरून नेले होते. त्यांना पोलिसांनी त्यांच्यागाडीसह पोलिसांनी अटक केली आहे. शिरगाव पोलीस पुढील (Shirgaon) तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.