Shirgaon : हातभट्टीची दारू निर्माण केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा, साडे तीन लाखांचे रसायन नष्ट

एमपीसी न्यूज – हातभट्टीची दारू तयार (Shirgaon) करणाऱ्या एका महिलेवर शिरगाव पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.15) शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या काठी करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे (वय 35 ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महिलेवर महाराष्ट्र दारु बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi:तेजस्विनी महिला विकास संस्थेचा वतीने पोलीस ठाण्यात व माऊली मंदिरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही कोणत्याही परवानगी शिवाय पवना नदी काठी जमिनीमध्ये दोन खड्ड्यांमध्ये दारू तयार करण्यासाठी 3 लाख 50 हजार रुपयांचे 700 लीटर रसायन तयार केले होते. पोलिसांनी (Shirgaon) कारवाई करत ते रसायन नष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.