Khed : सीएनजी पंपावरील कामगाराने केला रोख रकमेचा अपहार

एमपीसी न्यूज – सीएनजी पंपावर काम करणाऱ्या कामगाराने जमा झालेल्या रोख आणि ऑनलाईन रकमेचा अपहार केला. ही घटना 25 जुलै रोजी खेड तालुक्यातील धानोरे येथील राम गावडे पेट्रोल पंपावर (Khed) घडली.

अजय विजय ठाकूर (वय 37, रा. ब्रह्मगाव, ता. जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील बाबुराव वैद्य (वय 44, रा. वडगाव रोड, चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राम गावडे एच पी पेट्रोल पंपावर काम करतात. त्याच पंपावर अजय ठाकूर हा देखील काम करतो.

Alandi : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आळंदीमध्ये क्रांतीज्योतीचे आगमन

त्याने (Khed) वाहनांमध्ये सीएनजी भरलेली रोख स्वरुपात आणि त्याच्या बँक खात्यावर जमा झालेल्या 81 हजार 190 रुपयांचा अपहार केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.