Chinchwad : शाळा, कॉलेज परिसरात विनाकारण घुटमळणाऱ्या रोडरोमिओंची धरपकड

एमपीसी न्यूज – शाळा, कॉलेज मध्ये विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निदर्शनास आले. याबाबत कठोर कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड (Chinchwad) पोलिसांनी शाळा, कॉलेजच्या परिसरात 27 रोडरोमिओंची धरपकड केली.

Pimpri : अण्णाभाऊ यांनी कष्टकऱ्यांच्या मनात क्रांती रुजवली – काशिनाथ नखाते

गुन्हे शाखेचे गुंडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भोसरी, बालाजी लॉ कॉलेज ताथवडे, एम एम कॉलेज काळेवाडी, राजमाता जिजाऊ कॉलेज डुडुळगाव, निर्मल बेथनी कॉलेज काळेवाडी, फत्तेचंद जैन कॉलेज चिंचवड या कॉलेजच्या परिसरात कारवाई केली.

पोलिसांनी साध्या वेशात जाऊन शाळा कॉलेजच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या 27 तरुणांवर कारवाई केली. कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रार पेटी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत त्यांनी लेखी स्वरुपात तक्रार पेटीत तक्रार टाकावी, याबाबत देखील पोलिसांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

शाळा, कॉलेजच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने 100 पेक्षा अधिक पान टप-यांवर पालिकेच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. या टपऱ्या जप्त केल्या असून यापुढे शाळा, कॉलेजच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याचे आढळल्यास आणखी कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.