Talegaon Dabhade : महापुरूषांची चरित्रे म्हणजे जगण्याचे प्रेरणास्रोत – डाॅ. संभाजी मलघे 

एमपीसी न्यूज – सामाजिक बांधिलकी आणि मानवी जीवनमूल्यांसाठी आपल्या लेखनातून ब्रिटिश सरकारवर आसूड ओढणारे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे ही दोन्ही व्यक्तीमत्वे म्हणजे जगण्याचे प्रेरणास्रोत असल्याचे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे (Talegaon Dabhade) प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले.

Chinchwad : शाळा, कॉलेज परिसरात विनाकारण घुटमळणाऱ्या रोडरोमिओंची धरपकड

इंद्रायणी महाविद्यालयातील मराठी विभाग व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयातील विविध विद्या शाखांचे शिक्षक,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले. यावेळी डाॅ. संदीप कांबळे, प्रा मिलिंद खांदवे, प्रा आर आर डोके यांनी मनोगत व्यक्त केले. या दोन्ही महामानवांच्या वैचारिक आणि सामाजिक कार्यकर्तृत्त्वाचा आढावा या विचारवंतांनी आपल्या भाषणात घेतला.

यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी या दोन्ही महामानवांना शब्दसुमनांनी अभिवादन केले. सूत्रसंचालन प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले. आभार प्रा राजेंद्र आठवले यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.