Alandi : ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाचा 35 शाळांमध्ये शुभारंभ

एमपीसी न्यूज : ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा संस्कारक्षम उपक्रम (Alandi) गेल्या दोन वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या संकल्पनेतून श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज, देवाची आळंदी येथे यशस्वीरित्या राबविला जात आहे.

सदर उपक्रमाची यशस्वीता लक्षात घेऊन ओळख श्री ज्ञानेश्वरीची – एक परिवाराने (श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि आळंदी शहर पत्रकार संघ) एकत्रित येऊन श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे बालमनाला, तरूणांना संस्कारक्षम असल्यामुळे इतर शाळांमध्ये हा उपक्रम चालू व्हावा आणि या उपक्रमाची व्याप्ती वाढावी, शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न केले होते.

त्याचे पालकत्व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीनेे प्रमुख विश्वस्त योगेशजी देसाई साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतले. पत्रकार संघाचे त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून इतर शाळांना (Alandi) आवाहन केले.

त्यानुसार प्रतिसाद दिलेल्या शाळांमध्ये सोमवार दि. 31 जुलै रोजी एकाच दिवशी सदरचा उपक्रम सुरु करण्यात आला. त्या पुढीलप्रमाणे –

  • किड्स पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल (नंबर 1, नंबर 2)आळंदी देवाची
  • राजे शिवछत्रपती विद्यालय, आळंदी देवाची
  • संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, चंदननगर
  • कुंडेश्वर विद्यालय, पाईट
  • जोगेश्वरी विद्यालय, वाडेगोलाई
  • अंजली इंग्लिश मेडियम स्कूल, वडगावशेरी
  • शिवराज विद्यालय, वडगावशेरी
  • कै. गणपतराव गोविंद थिटे प्राथमिक विद्यालय, खराडी
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे
  • नवीन माध्यमिक विद्यालय, मरकळ
  • सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी
  • समता विद्यालय, सद्गुरुनगर-भोसरी
  • धनेश्वर माध्यमिक विद्यालय, धानोरी
  • आनंद इंग्लिश मेडियम स्कूल, कुरुळी
  • श्री समर्थ इंग्लिश मेडियम स्कूल – मोई,निघोजे,चिंबळी फाटा,
  • स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठान, चाकण
  • इंदिराजी माध्यमिक विद्यालय, मोई
  • श्री भामचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भांबोली
  • साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, खरपुडी
  • कै. श्रीधरराव वाबळे पा.विद्यालय, रेटवडी
  • कै. बाबुराव गेनुजी पिंगळे पा. विद्यालय, गुळाणी
  • सुभाष माध्यमिक विद्यालय, बहुळ
  • रेणुका माध्यमिक विद्यालय, रासे
  • सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदुर
  • नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय, काळुस
  • मॉडर्न हायस्कुल, भोसे
  • गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय, गोतंडी, ता. इंदापूर
  • श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी, ता. भोर
  • सनफ्लॉवर पब्लिक स्कूल, मारुंजी, ता. मुळशी
  • श्री म्हतोबा तुकाराम बालवडकर विद्यालय, बालेवाडी (पुणे शहर)
  • एस पी स्कूल, वाकड (पुणे शहर)
  • ज्ञानेश्वर बालाजी मुरकुटे विद्यालय, बाणेर (पुणे शहर)

अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील खेड, मुळशी, इंदापूर, पिंपरी चिंचवड व पुणे शहर या भागात उपक्रम चालू झाला. अशा एकूण 35 शाळांमध्ये या चारही संस्थांचे पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे, स्थानिक संस्थांचे-शाळांचे पदाधिकारी, स्थानिक पत्रकार, परिसरातील वारकरी सांप्रदायातील कीर्तनकार, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीमध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

सहभागी शाळांना श्री ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या पारायण प्रती, हरिपाठ पुस्तके, आणि ओळख ज्ञानेश्वरीचे अध्यापक ह.भ.प.सुभाष महाराज गेठे यांनी हरिपाठाचे विवेचन केलेला पेनड्राईव्ह असे उपक्रमाचे उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले.

Talegaon Dabhade : महापुरूषांची चरित्रे म्हणजे जगण्याचे प्रेरणास्रोत – डाॅ. संभाजी मलघे 

या उपक्रमात सहभागी शाळांमधील ‘इयत्ता – चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हरिपाठ पाठांतर, सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हरिपाठ विवेचन आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ इ. उपक्रम राबविले जातात. उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ या संत साहित्यांची आजच्या पिढीला असलेली आवश्यकता विशद केली.

भावी पिढीला संस्कारक्षम बनविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक व उपयुक्त असल्याचे मान्यवरांनी सांगितले. महाराष्ट्रातील इतर शाळांनीही प्रेरणा घेऊन हा उपक्रम आपल्याही शाळेत सुरु करावा, असे आवाहन परिवाराचे सदस्य अजित वडगांवकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.