Alandi : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आळंदीमध्ये क्रांतीज्योतीचे आगमन

एमपीसी न्यूज : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त (Alandi) आळंदी नगरपरिषदेत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालिका आधिकारी, कर्मचारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार गौरवण्यात यावे. यासाठी साहित्य क्रांती ज्योत वाटेगाव ते पुणे, पुणे ते आळंदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ती क्रांती ज्योत आळंदी नगरपरिषद ते भाजी मंडई मार्ग क्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ येऊन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन नदी पलीकडील (हवेली विभागातील) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी नियोजित असणाऱ्या जागेकडे तिने मार्गक्रमण केले.

Pimpri : अण्णाभाऊ यांनी कष्टकऱ्यांच्या मनात क्रांती रुजवली – काशिनाथ नखाते

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी नियोजित असणाऱ्या जागेमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भगवानराव वैराट व महेश शिंदे यांनी तेथील जागेत त्यांचे स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ते पूर्ण करू यावेळी त्यांनी सांगितले.

तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यांचे जीवन कार्य, नागरिकांच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती जन जागृती या विषयी माहिती  (Alandi) देत विविध जाती धर्मामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी जनजागृती करण्यात आली.

यावेळी यावेळी आबा शिंदे, संतोष सोनवणे, गणेश काळे, लहू गायकवाड, राहुल चव्हाण, किरण नरके, निलम सोनवणे, उद्धव  कांबळे, अविनाश पाटोळे, अमर कांबळे, आदेश सोनवणे व अनेक नागरिक उपस्थित होते. क्रांती पार्क येथे भाईचारा फाऊंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.