Khed News : खेड समन्वय समितीच्या वतीने जुनी पेंशन रॅली चे आयोजन

एमपीसी न्यूज- जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय, निमशासकीय (Khed News) कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे.खेड समन्वय समिती च्या वतीने खेडमध्ये देखील पेंशन रॅलीचे अयोजन करण्यात आले होते.

Chakan News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

आज दि. 14 मार्च पासून जुन्या पेंशन साठी सरकारी,निमसरकारी,कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने हा बेमुदत संप होत आहे.या निमित्ताने आज खेड समन्वय समिती च्या वतीने खेड मध्ये एकच मिशन जुनी पेंशन या रॅली अयोजन करण्यात आले होते.

या मध्ये सरकारी,निमसरकारी,कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी इ. 1600 कर्मचारी सहभागी झाले होते. यादरम्यान तालुक्यातील गटविकास अधिकारी, तहसीलदार, (Khed News) प्रांत अधिकारी या सर्वांना निवेदने देण्यात आली. जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.

 

सरकारी,निमसरकारी, कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बहु संख्येने या रॅलीमध्ये  सहभागी झाले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.