PCMC: महापालिकेचे कर्मचारी संपावर

एमपीसी न्यूज –  जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी (PCMC)  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी सकाळपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे सकाळपासून पालिकेचे कामकाज बंद आहे.

महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळपासून कर्मचा-यांनी ठिय्या मांडला आहे. 3 हजार 152 कर्मचारी संपावर गेले आहेत. 2005 नंतर महापालिका सेवेत 3 हजार 152 कर्मचारी रूजू झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रदीर्घ काळ कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देऊन सेवेत नियमित करावे. महापालिकेतील रिक्‍त पदे भरावीत. अनुकंपा तत्वावरील नियुक्‍त्या तसेच करोना काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वयात सूट देऊन सेवेत सामावून घ्यावे. केंद्र सरकारच्या धर्तीवर विविध भत्ते लागू करावेत.

Chakan News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

चतुर्थश्रेणीतील पदे निरस्त करू नयेत. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्‍न तत्काळ सोडवावेत. सेवानिवृत्तीचे वय 60 करावे. आरोग्य विभागातील नर्स व कर्मचाऱ्यांचे आर्थिक (PCMC) व सेवा नियमांच्या समस्यांचे निराकरण करावे, यासह विविध मागण्यांसाठी कर्मचा-यांनी सकाळपासून संप सुरु केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.