Pimpri News : दुर्धर व्याधीग्रस्त महिलांना किराणा मालाचे वितरण

एमपीसी न्यूज महिला दिनानिमित्त दुर्धर आजाराने व्याधीग्रस्त (Pimpri News) असूनही जिद्दीने घरकाम आणि मोलमजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या महिलांना जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण समिती महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने संसारोपयोगी किराणा साहित्याचे वितरण तसेच पालक गमावलेल्या अठरा वर्षे वयाखालील मुलांना पौष्टिक आहार (न्युट्रिशन किट) पाकिटांचे वाटप करण्यात आले.

 

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून सोमवार (दि.13) पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृह, येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा तीस महिला आणि वीस लहान मुलांनी लाभ घेतला.

PCMC: महापालिकेचे कर्मचारी संपावर

पिंपरी-चिंचवड महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन यादव, उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, खजिनदार रोहिणी यादव, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अशोक कोकणे, प्रकाश पाटील, दत्तात्रय काजळे, नीलिमा भागवत, राजश्री शिर्के जागृत नागरिक महासंघ जेजुरी विभागप्रमुख किशोर खोमणे, मावळ येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश लालगुडे, माहिती अधिकार कार्यकर्ते नवनाथ खोमणे, गिरीश झगडे आदी उपस्थित होते.

 

सतीश घावटेमर्दान, दत्तात्रय देवकर, मच्छिंद्र कदम, प्रकाश गडवे यांनी संयोजनात सहकार्य केले. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. महासंघाचे सचिव उमेश सणस यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.