Pune News : पुण्यातील रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी मनपा देणार अनुदान

एमपीसी न्यूज : पुणे शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ई वाहनांना प्राधान्य देण्यासाठी पुणे महानगर पालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. (Pune News) शरातील रिक्षांचे ई-रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी महानगर पालिका 25 हजार रुपयांचे अनुदान देणार  आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहीती दिली. विक्रम कुमार म्हणाले, रिक्षाचे ई-रिक्षामध्ये रूपांर करण्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यातील 25 हजार रूपये हे पुणे महानगरपालिकेकडून दिले जाणार आहे. तर उरलेली 60 टक्के रक्कम वाहन मालकाला द्यावी लागणार आहे. हे रिक्षा चार्ज करण्यासाठी पालिका शहरात चार्जिंगस्टेशन उभारणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.

Pimpri News : दुर्धर व्याधीग्रस्त महिलांना किराणा मालाचे वितरण

शहरात मोठ्या प्रमानात वाहने असल्याने प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, शहरातील अनेक रिक्षा या सीएनजीवर आहेत. सध्या सीएनजीचे दर देखील वाढले आहे. (Pune News) त्यामुळे दरवाढ झाली आहे. यामुळे वाढत्या प्रदूषण कमी करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार पुण्यात हा उपक्रम राबवण्यात येणार असून यासाठी महापालिकेकडून हे 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याने रिक्षा चलकांना मोठा फायदा होणार आहे.

या सोबत पालिकेचा दुहेरी उद्देश देखील साध्य होणार आहे. शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी देखील महापालिकेकडून तीन चाकी आॅटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.