Kondhwa : लग्नाचे आमिष दाखवून धमकी देत बलात्कार करणाऱ्या पोलीस शिपायाचे निलंबन

एमपीसी न्यूज – ज्या पोलीसांना पाहून सुरक्षित (Kondhwa) वाटावे त्याच पोलिसाने एका तरुणीचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत तरुणीचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे लैंगीक शोषण करणाऱ्या पोलीस शिपायाला पोलीस आयुक्तांनी निलंबीत करण्यात आले आहे.

अरफाज अरिफ शेख असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याची सध्या पोलीस मुख्यालयातील डी कंपनीत नेमणूक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तेथे तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. तिच्या नकळत अश्लिल व्हिडिओ बनविले. तिने लग्नाविषयी वारंवार विचारले असता काय करायचे ते कर, जास्त मागे लागली तर तुझे व्हिडिओ कोठे पाठवितो ते बघ,असे बोलून त्याने फिर्यादी तरुणीला धमकी दिली होती.

Alandi : सुभेदार यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी साजरी

सर्व प्रकार उघडकीस आला असता पुणे पोलिसांनी पोलिसांची प्रतिमा मलीन करणारा हा प्रकार असल्याने शेख याचे त्वरीत निलंबन केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=a-ColLCgpns

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.