Khed Crime : जाब विचारला म्हणून मारहाण करत गाडीची तोडफोड

एमपीसी न्यूज- जाब विचारल्याने तरुणाला जबर मारहाण करत गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी खेड तालुक्‍यातील (Khed Crime) कडाचीवाडी येथे घडली.

अक्षय (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी अक्षय याच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सत्यम दत्तात्रय कड (वय 22), विराज कृष्णा कड (वय 20), वैभव शांताराम कड (वय 32, सर्व रा. कडाचीवाडी, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kondhwa : लग्नाचे आमिष दाखवून धमकी देत बलात्कार करणाऱ्या पोलीस शिपायाचे निलंबन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे आरोपी हे (Khed Crime) करण सरदार या व्यक्तीला मारहाण करीत होते. त्यामुळे फिर्यादी या आरोपी यांना जाब विचारण्यासाठी गेल्या. आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ केली आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी दोन कार आणि दोन दुचाकींची तोडफोड करत नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.