Chinchwad : साहित्यिक राजन लाखे यांचा फेस ऑफ इन्स्पिरेशन पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – साहित्य क्षेत्रात मागील 20 वर्षांपासून कार्यरत असलेले लेखक, कवी राजन लाखे यांचा एक्सप्रेस मिडिया एंटरप्रायझेस पुणे यांच्या वतीने (Chinchwad) ‘फेस ऑफ इन्स्पिरेशनपुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या सोहळ्यात अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, मनीषा थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

Pune News : वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेस पक्षाचे आंदोलन

राजन लाखे हे साहित्य क्षेत्रातील नवोदित तसेच प्रस्थापितांसाठी नवनवीन उपक्रम राबवित असतात. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या नुकत्याच झालेल्या जन्मशताब्दी निमित्त 100 मान्यवर, 100 आठवणी, 100 कविता हा प्रकल्प लाखे यांनी राबवला. यासाठी त्यांना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले. (Chinchwad) पिंपरी-चिंचवड शहरात प्रथम काव्य पहाट तसेच साहित्यिकांची आरोग्य तपासणी असे उपक्रम त्यांनी सुरु केले. लेखक, संपादक, कवी, कार्यकर्ता म्हणून त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.