Pune News : वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेस पक्षाचे आंदोलन

एमपीसी न्यूज -राज्य सरकारने वीज दरवाढ करण्याचा निर्णय (Pune News) घेतला आहे.त्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

 

Bhosari News : ‘चतुःसूत्री घेऊन आनंदी सेवाकार्य करणारा पुणे भोजापूर लायन्स क्लब’

 

यावेळी अरविंद शिंदे म्हणाले की,मागील अनेक महिन्यापासून पेट्रोल,डिझेल आणि गॅसची दरवाढ केली जात आहे.आता त्यामध्ये विजेचे दर वाढविण्यात आले आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

या केंद्र आणि राज्य सरकारला सर्व सामान्य नागरिकांचे कोणत्याही प्रकारची काळजी नसून केवळ उद्योगपतीच जीवनमान कस सुधारेल याकडेच यांच लक्ष आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे देखील जीवनमान उंचावले पाहिजे.

ही आमची मागणी नसून राज्य सरकारने लवकरात लवकर वीज दरवाढ मागे घ्यावी अन्यथा राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी (Pune News) त्यांनी दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.