Lohagaon News : बांधकाम व्यवसायिक बंडूशेठ खांदवे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूतील शिळा मंदिराला 51 हजारांची देणगी

एमपीसी न्यूज : लोहगाव येथे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक बंडूशेठ खांदवे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट घेत अभिष्टचिंतन केले. बंडूशेठ खांदवे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूगाव येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या सुवर्ण कळसासाठी 51  हजार रुपयांची देणगी देण्यात आली.

वाढदिवसाचे औचित्य साधून एमपीसी न्यूजच्या वतीने बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे यांनी अंतरंग दिवाळी अंकाची एक प्रत त्यांना भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. रेखाताई टिंगरे व श्रीयुत टिंगरे, रामदास खांदवे उपस्थित होते.

टिंगरे यांना देखील मासिक दिले. यावेळी उपस्थित पाहुणे मनसेचे राज्य सहचिटणीस कृष्णा मोहिते यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.