गोळवलकर गुरुजी विद्यालयात ‘आनंदजत्रा’

एमपीसी न्यूज – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात पालकांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदजत्रा’ या उपक्रमाचे उद्घाटन ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक यांच्या हस्ते करण्यात आले.

‘दे आसरा’ या संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धिसाठी मार्गदर्शन आणि अशा उद्योजकांना ग्राहक पेठेमध्ये स्टॉल लावण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे पाठक यांनी यावेळी सांगितले.

 

खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ, गोमय उत्पादने, कपडे आणि हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा प्रदर्शनात समावेश होता.

शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका मंजूषा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक विकास दिग्रसकर, वरदा पटवर्धन, स्वाती राजगुरू आणि नेहा जोशी यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.