Maharashtra : बहुचर्चित सुरेश दुबे खून खटल्यातून भाई ठाकूरची निर्दोष सुटका; 34 वर्षांनी लागला निकाल

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून खटल्यातून (Maharashtra) जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांच्यासह तिघांची निर्दोष सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांनी हे आदेश दिले आहेत. हा खटला ताडा कायद्यांतर्गत दाखल असलेला देशातील शेवटचा खटला होता. विरार येथे ही घटना घडली होती. 

 

सुरेश दुबे खून प्रकरणात 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील सहा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर जयंत उर्फ विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर आणि गजानन पाटील या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यात आतापर्यंत नरेंद्र भालचंद्र भोई, राजा जाधव, माणिक पाटील, उल्हास राणे, ज्ञानेश्वर पाटील आणि पट्रिक तुस्कानो यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Pimpri : उष्माघाता पासून बचाव करा असा

 

नालासोपारा (Maharashtra) रेल्वे स्थानकावर 9 ऑक्टोबर 1989 रोजी गोळ्या झाडून सुरेश दुबे यांचा खून करण्यात आला होता. त्यावेळी या परिसरात भाई ठाकूर याची दहशत होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. या खटल्याला 2005 मध्ये सुरुवात झाली होती. या प्रकरणात अंशुल अधिक साक्षीदार कोर्टाने तपासले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.