Pimpri : उष्माघाता पासून बचाव करा असा

एमपीसी न्यूज – शहरात उन्हाचा तडाखा वाढत आहेत. या तापत्या उन्हात शरीराची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. त्यासाठी उन्हाळयात थंड पदार्थांचे सेवन केले पाहिजे. त्यामध्ये काकडी, कलिंगड, सरबत, गिलोयचे पेय, थंड पेय तसेच थंड पदार्थांचे तूम्ही सेवन करु शकता.

Dehugaon : कंपनीत चोरी करणाऱ्या एकास अटक

उन्हाळयाच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच आहारात थंड पदार्थांचा समावेश केल्याने तुम्ही थंड राहु शकता. उन्हाळयात मसालेदार पदार्थ खाणे टाळायला हवेत. असा सल्ला पिंपरीतील ) (Pimpri आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

नोकरी व अन्य कामानिमित्त प्रत्येकाल घराबाहेर पडावे लागते. मात्र, शहरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. अशा वेळी उष्माघातापासुन बचाव करण्यासाठी आपल्या आहाराकडे आधिक लक्ष देणे गरजेचे आहे. चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे आपण अनेक आजारावर मात करु शकतो.

त्यामध्ये उन्हळयाच्या दिवसात होणार त्रास म्हणजेच उष्णघात हा आहे. उन्हाळयात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागतात. त्यामुळे त्यांचा परिणाम वाईट होतो. त्यामुळे, प्रवासादरम्यान नागरिकांना मळमळ, चक्कर येणे, घसा सुखणे, अशा शारीरिक समस्या निर्माण होताना दिसत आहेत.

उन्हाळयात किती पाणी घ्यावे –
उन्हाळयाच्या दिवसात उष्माघात टाळ्यासाठी दिवसभरातून आठ ते नऊ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच या दिवसात ताक, लस्सी, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, या सारख्या थंड पेयाचा आहारात समावेश करावा. त्यामुळ तुम्हाला थंडावा जाणवेल. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडणे टाळावे. उष्माघात टाळ्याण्यसाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

मसालेदार पदार्थ खाणे टाळावे-
उन्हळयाच्या दिवसात तुम्ही तिखट पदार्थ खाता असाल.  त्यामुळे, शरीरात दाह निमार्ण होऊ शकतो. शक्यता उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट , तिखट , मसालेदार पदार्थीचे सेवन करु नये. या दिवसात तुप शरीरासाठी लाभदायक ठरते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.