Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का; अखेर नीलम गोऱ्हे यांनी निवडला शिंदे गटाचा मार्ग

एमपीसी न्यूज : सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या (Maharashtra Politics ) राजकीय भुंकपात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेतील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला राम राम केला असून शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. 

2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून दोन गट पाडले. तब्बल 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण यावेळी महिला आघाडी मात्र ठाकरे गटात राहिली. परंतु, त्याच वेळी सुषमा अंधारे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्याने बऱ्याच महिलांना नाराजी पत्करावी लागली.

Chikhali : मुलाचे नवीन घर पाहण्यासाठी आलेल्या महिलेचा खून

नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे, दीपाली सय्यद भोसले, शीतल म्हात्रे यांची नावे सुषमा अंधारे यांच्यामुळे मागे पडत गेली. आणि अंतर्गत वाद सुरू झाले. याच वादातून मनीषा कायंदे, दीपाली सय्यद भोसले, शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाकडे आपला कल असल्याचे दाखवून दिले.

अन अखेर आता ठाकरे गटातील प्रतिष्ठित तसेच मोठे नाव (Maharashtra Politics ) असलेल्या नीलम गोऱ्हे अखेर आज ठाकरे गटातून बाहेर पडल्या.

यामुळे आता उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत आपले वर्चस्व दाखवणे फार कठीण जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.