Pune : रिझर्व्ह बँकेने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत शासकीय सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांनी मारली बाजी

एमपीसी न्यूज : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समन्वयाने (Pune) जी 20 व अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 3 जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता विशेष प्रश्नमंजुषा परिक्षा बिबवेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.  

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उपस्थित सर्व शिक्षकांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. क्विझ मधील सहभागी शाळांमधून जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस येरवडा येथील शासकीय सफाई कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींच्या शाळेतील प्राजक्ता सुभाष आबनावे व यश शंकर पंडित या दोघांनी पटकावले. त्यांना रोख रक्कम रुपये दहा हजार, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रकाचे पारितोषिक देण्यात आले.

या विद्यार्थ्यांची स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये निवड झाली असून तिचा पुढील टप्पा देश पातळीवर असणार आहे. सदर क्वीजसाठी सहभागी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता व इतर सर्व सोयी सुविधा भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का; अखेर नीलम गोऱ्हे यांनी निवडला शिंदे गटाचा मार्ग

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सदर (Pune) कार्यक्रमात निखिल गुलाक्षी, श्रीकांत कारेगावकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास एल. डी. ओ. व व्यवस्थापक भारतीय रिझर्व बॅंक मुंबईचे निखिल गुलाक्षी, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक तथा मुख्य प्रबंधक श्रीकांत कारेगावकर, अग्रणी बँक अधिकारी प्रमोद सूर्यवंशी तथा वित्तीय साक्षरता अधिकारी पी. एस. सरडे, मुख्याध्यापक धाकपाडे  तसेच पुणे जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.