Maharashtra : 97 वे मराठी साहित्य संमेलन होणार अमळनेरला

एमपीसी न्यूज – 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत (Maharashtra) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार असून प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर हे संमेलन भरणार आहे. नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे अध्यक्षीय भाषण संमेलनाच्या उद्घाटन सत्रातच होणार आहे. जन्मशताब्दी वर्ष असलेल्या साहित्यिकांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा वेध घेणारा ‘साहित्यिकांचे  शताब्दी स्मरण’ हा विशेष कार्यक्रम संमेलनात होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये अमळनेर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

Pune : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिली तर पालकांवर होणार कायदेशीर कारवाई

संमेलन पूर्व कार्यक्रमात 1 फेब्रुवारी रोजी बालमेळावा होणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन उद्घाटन, ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. निमंत्रितांचे कविसंमेलन, ‘खान्देशी बाणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

3 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिकाची मुलाखत, दोन परिसंवाद, कथाकथन, एका जुन्या पुस्तकावर परिचर्चा आणि खान्देश साहित्य वैभव असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. विस्मृतीमध्ये जात असलेल्या कवींच्या कवितांचे सादरीकरण सध्याच्या पिढीतील कवी सादर करणार असून ते या कवितांविषयी भाष्य करतील.

रविवार 4 फेब्रुवारी रोजी दोन परिसंवाद, अभिरूप न्यायालय, कवी कट्टा आणि गज़ल कट्टा असे कार्यक्रम होणार असून दुपारी चार वाजता संमेलनाचे समारोप सत्र होईल. संमेलनात एक लेखक आणि एक प्रकाशकाचा सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये 250 गाळे असून पुस्तक प्रकाशनासाठी ग्रंथ प्रकाशन कट्टा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.