Pune : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिली तर पालकांवर होणार कायदेशीर कारवाई

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलांच्या हाती (Pune) वाहन देणे आता पालकांना महागात पडणार आहे. अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना 25 हजार रूपये दंड केला जाणार आहे. अल्पवयीन मुलांना 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना ही मिळणार नाही. याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिले आहेत.

परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 18 वर्षांखालील मुलगा अथवा मुलीस सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास परवानगी नाही. याला केवळ 50 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकींचा अपवाद आहे.

या दुचाकी 16 वर्षांवरील सर्वांना चालविण्यास परवानगी आहे. अल्पवयीन मुलांनी वाहने चालवू नयेत, यासाठी कारवाईच्या सूचना परिवहन विभागाकडून सातत्याने केल्या जात आहेत. त्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे यापुढे या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. सर्व आरटीओने अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घ्यावी.

Pune : संत निरंकारी मिशनचा महिला संत समारोह उत्साहात संपन्न

मोटार वाहन कायदा (सुधारित) 2019 नुसार, अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तुरूंगवास होऊ शकतो. हा तुरूंगवास तीन वर्षांपर्यंत आहे. याचबरोबर 25 हजार रूपये दंडाची ही तरतूद आहे. तसेच, त्या अल्पवयीन मुलाला वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंचा वाहन चालवण्याचा परवाना मिळणार (Pune) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.