Pune : संत निरंकारी मिशनचा महिला संत समारोह उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या ( Pune ) आशीर्वादाने ,पुणे झोनचा महिला संत समागम संत निरंकारी सत्संग भवन जयजवान नगर,खराडी (फॉरेस्ट पार्क) या ठिकाणी रविवार (दि.25) जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या सत्संग कार्यक्रमासाठी पुणे झोनच्या सर्वच शाखांमधून 3 हजार 500 पेक्षा अधिक संख्येने महिलांनी सत्संगात सहभाग घेतला.

Pune : ‘स्वरभारती : महाराष्ट्राचे लोकसंगीत’ कार्यक्रम संपन्न

मुख्य सत्संगच्या अगोदर ब्रम्हनादाचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्रातील प्राचीन संत परंपरेचा इतिहास दाखविण्यात आला. महिलांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हुबेहूब दर्शन घडवून दिले.मुख्य सत्संग दरम्यान समुह गायन,अभंग,कविता,लघुनाटिका तसेच विचारांच्या माध्यमातून महिलांनी सद्गुरु प्रती आपले भाव व्यक्त केले.

पुष्पा करमचंदानी आणि काबुगडे बहेन यांनी डोंबिवली वरून आलेल्या मुख्य अतिथी दीपा मखिजा जी तसेच संपूर्ण पुणे झोन मधून आलेल्या महात्मा, बहेंनजींचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धन्यवाद व्यक्त ( Pune ) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.