Maharashtra – मतदान केंद्रावर ह्रदयविकाराचा झटक्याने मतदाराचा मृत्यू

एमपीसी न्युजू – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील(Maharashtra) करंजी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान सुरु असताना मतदार सुनील गांधी यांना मतदान केंद्रावरच ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे पार पडले.

World Cup 2023 : विराट कोहलीचे शानदार शतक! भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले 327 धावांचे आव्हान

तसेच 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या (Maharashtra)पोटनिवडणुकासाठीही मतदान झाले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान सुरु असताना मतदार सुनील गांधी यांनी मतदान केले.

मतदान करून केंद्राबाहेर आल्यावर त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यामुळे सुनील गांधी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, सुनील गांधी यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. सुनील गांधी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. परंतु गावातील मतदान असल्यामुळे ते मतदानासाठी आले होते. या घटनेनंतर गावात सर्वत्र शोककळा पसरली.

निवडणुकीचा निकाल सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.