Punawale : कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार : नाना काटे

एमपीसी न्यूज – मोशीतील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येत असल्याने पुनावळे येथे (Punawale)लवकरात लवकर कचरा डेपो उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी सर्व सोसायटी धारकांनी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे भेट घेवून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कचरा डेपो विरोधात निवेदन दिले.

यावर बोलताना नाना काटे यांनी पुनावळे नियोजित कचरा डेपोच्या(Punawale) सभोवताली अनेक उच्चभ्रू मोठमोठ्या सोसायटी असल्याने या डेपोचा त्रास येथील नागरिकांना होणार आहे. या भागात अनेक आयटी कर्मचारी वास्तव्यास आले आहेत. या कचरा डेपोच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी झाल्याने मध्यभागी होणारा पुनावळे कचरा डेपो मानवी जीवनाचा विचार करता शहराच्या अन्य भागात स्थलांतरित करावा अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे, असे आश्वासन काटे यांनी सोसायटीधारकांना दिले.

World Cup 2023 : विराटचे 49 वे शतक ; भारताचे दक्षिण आफ्रिकेला 327 धावांचे लक्ष्य

रद्द करा…रद्द करा… कचरा डेपो रद्द करा… अशा घोषणांनी रविवार सुट्टीचा दिवशी पुनावळे परिसर दणाणून गेला. आयटी परिसरालगत असलेला पुनावळे, मारुंजी, जांभे, नेरे, विनोदेवस्ती या परिसरातील अनेक सोसायटीधारक आज नियोजित कचरा डेपो विरोधात रस्त्यावर उतरून पुनावळे कचरा डेपो रद्द करण्यासाठी निदर्शने केली.

मोशीतील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने पुनावळे (Punavale)येथे कचरा डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु स्थानिक नागरिक कचरा डेपोला विरोध करत असून कचरा डेपो हटवा, पुनावळे वाचवा, अशा आशयाचे फलक मोहीम सुरू केली आहे. त्यातच आज परिसरातील अनेक नागरिक बाईक रॅली काढून निदर्शने केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2008 मध्ये पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला आहे. त्यावेळी पुनावळे भागात नागरीकरण झालेले नव्हते. मात्र, 15 वर्षात या भागात मोठे नागरीकरण झाले असून पुनावळे परिसरातील लोकसंख्या एक लाख पेक्षा अधिक झाली आहे.

इथले नैसर्गिक वातावरण, बाजूला असलेले आयटी पार्क आणि पुनावळे येथे आरोग्य, शिक्षण, गृह प्रकल्प या सुविधांमुळे नागरिक इथे राहण्याला पसंती देत आहेत.
2008 पासून प्रस्तावित असलेल्या कचरा डेपोला स्थानिक सोसायटीधारक विरोध करत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, कचरा डेपोमुळे पुनावळे येथील नैसर्गिक संपत्ती नष्ट होईल. नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागेल. हा प्रकल्प शहराच्या पश्चिम दिशेला आहे. हवेचा प्रवाह नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे असतो. हा कचरा डेपो झाल्यास पुनावळेतील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागेल.

महापालिका प्रशासनानेयेथील जागा ताब्यात घेण्यासाठी वन विभागाला चंद्रपूर येथे जमीन विकत घेऊन देण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. मोशीतील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येत असल्याने पुनावळे येथे लवकरात लवकर कचरा डेपो उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

यासाठी सर्व सोसायटी धारकांनी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे भेट घेवून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कचरा डेपो विरोधात आपली निवेदन दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.