World Cup 2023 : विराटचे 49 वे शतक ; भारताचे दक्षिण आफ्रिकेला 327 धावांचे लक्ष्य

एमपीसी न्यूज – विराट कोहलीच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या (World Cup 2023)जोरावर भारताने आफ्रिकेला 327 धावांचे लक्ष्य दिले. या शतकाने विराटने सचिन तेंडूलकर च्या एकदिवसीय सामन्यातील 49 शतकांची बरोबरी केली आहे.

 

कोलकत्ता येथे सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यात (World Cup 2023 )भारताने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा 40 आणि शुभमन 23 यांनी जोरदार फटाके बाजी करत डावाची सुरुवात केली.

Dighi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

श्रेयस अय्यर 76, विराट कोहली च्या 101 धावा शतकामुळे भारताने आफ्रिकेसमोर 326 धावांचे लक्ष्य उभे केले. शेवटच्या षटकांत रवींद्र जडेजाने 29 धावांची जोरदार फटकेबाजी केले. भारतीय गोलंदाजीचे आव्हान आफ्रिकेला असणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.