Maval : मावळ तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी 77.84 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 5) मतदान (Maval)पार पडले. यामध्ये 14 हजार 693 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात 77.84 टक्के मतदान झाले. मावळ तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील चार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर दोन गावांमधील सरपंच पदांची बिनविरोध निवड झाली आहे.

तालुक्यात 15 गावांमध्ये 46 मतदान केंद्रांवर मतदान (Maval)झाले. 15 गावांमध्ये 9 हजार 334 पुरुष मतदार तर 9 हजार 540 पुरुष मतदार आहेत. दोन तृतीयपंथी मतदारांसह 15 गावांमध्ये 18 हजार 876 मतदार आहेत. रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात 24.60 टक्के मतदान झाले.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार सात हजार 294 महिला आणि सात हजार 394 पुरुष मतदारांनी मतदान केले. एकूण 77.84 टक्के मतदान झाले.

Chakan : टेम्पोच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू; वडील गंभीर जखमी

15 गावांमधील 151 जागांसाठी 217 जणांचे उमेदवारी अर्ज आले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 20 ऑक्टोबर पर्यंत होती. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी झाली. या छाननी मध्ये 13 जणांचा अर्ज बाद झाले. 25 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. सरपंच पदाच्या 19 जागांसाठी 117 उमेदवारी अर्ज आले होते. त्यातील 49 जणांनी अर्ज माघारी घेतले असून आता 13 गावच्या सरपंच पदासाठी 68 जण रिंगणात होते.

मावळ तालुक्यात 19 ग्रामपंचायतीपैकी बेबडओहोळ, आढले बुद्रुक, लोहगड आणि ओव्हाळे या चार ग्रामपंचायतींची पूर्ण निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे या गावांमध्ये मतदान प्रक्रिया झाली नाही. तर शिरगाव आणि पुसाणे या गावांमध्ये सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असल्याने या दोन गावांमध्ये सदस्य पदांची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील दिवड, मळवंडी ढोरे, भाजे, सांगिसे, कोंडीवडे, उदेवाडी, शिळिंब, मुंढावरे या ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.