Pimpri News : पिंपरी-चिंचवडच्या पोलीस सह आयुक्तपदी मनोज लोहिया यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज  – कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सह आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे.(Pimpri News) याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाने आज (शनिवारी) काढले आहेत.

भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे राज्य सरकारच्या गृह विभागाने आदेश काढले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले मनोज लोहिया यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस सह आयुक्त पदावर बदली करण्यात आली.

Pimpri News : भाजपकडून पाकिस्ताचे परराष्ट्र मंत्री  बिलावल भुट्टो याचा निषेध; पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन

लोहिया यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी हे पदही होते. शासनाने ते पद आता पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या आस्थापनेवर वर्ग केले असल्याचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. (Pimpri News) दरम्यान, पुण्याचे मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची दोन दिवसांत दुसऱ्यांदा बदली केली आहे. गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था मुंबई या पदावरून राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक व महा निरीक्षक, कारागृह व सुधार सेवा पुणे येथे नियुक्ती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.