Pimpri News : भाजपकडून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री  बिलावल भुट्टो याचा निषेध; पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन

एमपीसी न्यूज – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्त्यूत्तर देत ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता. त्यावेळी पाकड्यांच्या लक्षात आले की, हिंदूस्थान केवळ चर्चा-समझोत्याच्या भाषेत नाही. तर आपल्या कृतीला जशाश तसे उत्तर देत आहे. (Pimpri News)  त्यामुळे पाकिस्तानच्या काही नेत्यांचा जळफळाट आजुनही सुरू आहे.  पंतप्रधान मोदी यांना खालच्या भाषेत बोलत आहेत. हा केवळ पंतप्रधानांचा नव्हे, तर तमाम भारतीयांचा अवमान आहे, अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो याने आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे मोरवाडी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले.

Pimpri News : अद्ययावत जैवतंत्रज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

आंदोलनाला विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, माजी महापौर  उषा ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांच्यासह, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड,राजेंद्र लांडगे, अनुराधा गोरखे,कमल घोलप, शर्मिला बाबर, महिला अध्यक्ष उज्वला गावडे, युवा अध्यक्ष संकेत चोंधे, अजित कुलथे, समीर जवळकर, नंदू कदम,शेखर चिंचवडे, प्रकाश जवळकर, सुप्रिया चांदगुडे,जयश्री वाघमारे, गणेश ढाकणे,निखिल काळकुटे, वैशाली खाड्ये, आशा काळे, सोनम जांभुळकर, कमलेश भरवाल, संजय मंगोडेकर, मुकेश चुडासमा, देवदत्त लांडे, दिनेश यादव, सागर हिंगणे, जयदेव डेम्ब्रा, संदीप नखाते, शिवदास हांडे,अमित गुप्ता, मंगेश धाडगे, निलेश अष्टेकर, शिवराज लांडगे, सचिन राऊत, विक्रांत गंगावणे,  दीपाली कारंजकर, संजय परळीकर आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांचा आदर प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र, पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या पंतप्रधानांबाबत आकस वाटतो.(Pimpri News) जगभरात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत आहे. मोदींच्या नेतृत्वात भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांचा जळफळाट झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.