Fire cases : नवीन वर्षाची सुरुवात भयानक; नाशिकसह सोलापूरच्या कारखान्यात भीषण स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत भयानक झाली आहे. नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यात मुंढेगावात असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कपंनीत मोठा स्फोट झाला आहे. येथे स्फोटामुळे लागलेली आग अजूनही धुमसत असताना.  सोलापूरच्या बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे.  या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Fire cases) बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. या घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

बार्शीतल्या पांगरी येथील फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती  सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं आहे.  जवळपास नऊ जण जखमी असून सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.  मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, जखमींना मदत करण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत, असं शंभरकर यांनी सांगितलं आहे.

आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच राज्यात नाशिकमधील इगतपुरी आणि सोलापुरातील बार्शीतील या दोन्ही घटनांमध्ये काही कामगारांना जीव गमावावा लागला आहे.

Pune News : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे विश्वशांती याग करून केले नवं वर्षाचे स्वागत

 

स्फोटामुळे नाशिक हादरले

नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यात मुंढेगावात असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कपंनीत मोठा स्फोट झाला. अजूनही इथली आग अनियंत्रित आहे. या स्फोटात दोघा महिलांचा मृत्यू झाला आहे.  17 जखमी, चौघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिली. (Fire Cases) या कंपनीतील बॉयलर फुटल्याची चर्चा परिसरात आहे.. तर केमिकल टँकर्सचा स्फोट झाल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये त्याचे हादरे जाणवले. स्फोटनंतर कंपनीला लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.