Maval : पवना धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज – पवना धरणात रविवारी (दि. 23) बुडालेल्या  ( Maval) तरुणाचा मृतदेह सोमवारी (दि. 24) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास सापडला. साहिल विजय सावंत (वय 18, रा. परळ, मुंबई) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

परळ येथील काहीजण रविवारी पर्यटनासाठी पवना धरण परिसरात आले होते. दुपारी धरणात पोहत असताना साहिल हा पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचविण्यात यश आले नाही. साहिलच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा करून मदत मागितली असता स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

Pune :  दांडेकर पूल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार वाढीव घरभाडे

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिवदुर्ग मित्र मंडळ, वन्यजीव रक्षक समिती, अपघातग्रस्तांचा मदतीला संस्था खोपोली या संस्थांना बोलावण्यात आले. तिन्ही संस्थेच्या स्वयंसेवकांनी रविवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र साहिल सापडला (Maval) नाही. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आली. दुपारी पावणे दोन वाजता साहिलचा मृतदेह सापडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.