Maval news : चांदखेडच्या नवनियुक्त सरपंच मीना माळी यांनी घेतली माजी मंत्र्यांची भेट

एमपीसी न्युज – मावळ तालुक्यातील चांदखेड गावच्या नवनियुक्त सरपंच मीना दत्ता माळी यांनी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांची भेट घेतली. (Maval news) सरपंच आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचा माजी मंत्री भेगडे यांनी सत्कार केला. तसेच चांदखेडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन भेगडे यांनी दिले.

मावळ तालुक्यातील नुकत्याच झालेल्या चांदखेड ग्रामपंचायत निवडणुकीत मीना दत्ता माळी यांची थेट जनतेतून सरपंचपदी भरघोस मताने निवड झाल्याबद्दल भेगडे यांनी अभिनंदन केले.

Damini pathak: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायचे दामिनी पथक केले कार्यान्वित

आज संत रामजीबाबा पॅनलच्या सरपंच व सर्व सदस्यांनी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांची भेट घेतली. यावेळी लोकनियुक्त सरपंच व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा (Maval news) सत्कार करण्यात आला व अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढील काळात चांदखेड गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असू असे आश्वस्त यावेळी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.