Maval : रस्त्यावर आढळलेल्या कासवाला जीवदान

एमपीसी न्यूज – रहदारीच्या रस्त्यावर आढळलेल्या कासवाला प्राणी मित्रांनी (Maval)जीवदान दिले. कासवाला पकडून इंद्रायणी नदीत सोडण्यात आले.

निलेश ओव्हाळ आणि प्रशांत ओव्हाळ हे शुक्रवारी (दि. 27) कंपनीतून रात्रपाळी संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांना एमआयडीसी मधील रस्त्यावर सॉफ्ट शेल जातीचे गोड्या पाण्यात आढळणारे कासव दिसले. एमआयडीसी मधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे त्या कासवाला इजा होण्याची दाट शक्यता होती.

Rohit Pawar : आपला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे म्हणत रोहित पवारांनी स्थगित केली संघर्ष यात्रा

निलेश ओव्हाळ आणि प्रशांत ओव्हाळ यांनी कासवाला उचलून (Maval)घरी आणले. त्यानंतर याबाबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, सदस्य प्रमोद ओव्हाळ यांना माहिती दिली. माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी ओव्हाळ यांच्या घरी जाऊन कासवाची पाहणी केली. त्याची प्राथमिक तपासणी करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

निलेश ओव्हाळ, विशाल घोजगे आणि प्रशांत ओव्हाळ यांनी त्या कासवाला इंद्रायणी नदीत सुखरूपपणे सोडून दिले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.