Alandi :आळंदीतील महाद्वार चौकात कॅन्डल मार्च

एमपीसी न्यूज – सकल मराठा समाज आळंदी देवाची व आळंदी सर्कल यांच्या वतीने (Alandi) मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दि.26 ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणास महाद्वार चौक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा समोर सुरवात झाली असून (दि.27 )आज त्या उपोषणा चा दुसरा दिवस आहे.आज महाद्वार चौकात सायंकाळी साडेसहा च्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला.

यावेळी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने (Alandi)चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.यावेळी बहुसंख्येने वारकरी विद्यार्थी, महिला वर्ग ,सकल मराठा समाज आळंदी सर्कलचे मान्यवर उपस्थित होते.

Maval : रस्त्यावर आढळलेल्या कासवाला जीवदान

आजच्या या साखळी उपोषणाचे उपोषणकर्ते शशिकांत राजे जाधव,अरुण कुरे हे होते. आज यशवंत संघर्ष सेना,श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी आणि श्री आळंदी धाम सेवा समिती यांनी या लढ्यास व मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.