Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात दोन दिवसीय शेअर मार्केट कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग (Talegaon Dabhade) व अंतर्गत गुणवत्ता सिध्दता कक्ष (IQAC)यांच्या संयुक्त विद्यमाने शेअर मार्केट या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शेअर मार्केट मधील विविध संकल्पना जाणून घेतल्या. बाजाराचे योग्य ज्ञान विद्यार्थ्यांना समृद्धीच्या दिशेने घेऊन जाते असा सल्ला, या कार्यशाळेत पिअर्सन शेअर मार्केटिंग अकॅडमीचे संस्थापक डॉ. दिनकर चव्हाण यांनी दिला.

कार्यशाळेस प्राचार्य प्रा. डॉ. संभाजी मलघे, अर्थशास्ञ विभागप्रमुख प्रा. के. व्ही. अडसूळ, डॉ. सत्यम सानप, कार्यशाळा समन्वयक डॉ. अर्चना जाधव व अंतर्गत गुणवत्ता सिध्दता कक्ष (IQAC) समन्वय डॉ. सदाशिव मेंगाळ, तसेच कला, वाणिज्य पदवी व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maval : रस्त्यावर आढळलेल्या कासवाला जीवदान

डॉ. दिनकर चव्हाण म्हणाले, “विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच अर्थार्जनाच्या शिक्षणाने समृद्ध होवून सध्याच्या (Talegaon Dabhade) स्पर्धेच्या युगात अत्याधुनिक ज्ञानासह आपला सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे.

याप्रसंगी शेअर्सची खरेदी व विक्री पध्दती, इंट्राडे ट्रेडिंग नियम, सेन्सेक्स, निफ्टी अशा शेअर मार्केट मधील विविध संकल्पना आणि त्यांचे सखोल ज्ञान यावेळी डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. मलघे यांनी विद्यार्थ्यांना अर्थसाक्षर होण्याचा सल्ला देत. शेअर मार्केटचे अद्ययावत आणि सखोल ज्ञान घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे असे प्राचार्य डॉ मलघे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.के व्ही अडसुळ यांनी केले.डॉ. अर्चना जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सदाशिव मेंगाळ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.