Maval : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळच्या शिक्षक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळच्या (Maval) वतीने शिक्षक मेळावा व पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप समारंभ व्ही पी एस प्रशाला लोणावळा येथे उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षकांच्या विविध प्रकारच्या अडचणी व समस्या शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून सोडविण्याबाबत मेळाव्यात चर्चा झाली. तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सभासद होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

सरस्वती पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचे संघटन मंत्री  गुलाबराव गवळे हे होते. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्ह्याचे (Maval) अध्यक्ष निलेश काशीद तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा कार्यवाह महेश शेलार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, व्ही. पी. एस. प्रशालेच्या प्राचार्या अंजनी गानू , पवना शिक्षण संकुलाचे नवनिर्वाचित प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, उपप्राचार्य दहिफळे आदिनाथ, उपमुख्याध्यापक महिंद्रकर उदय, ढिले सुनिता रसाळ, वि. तालुका अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्याध्यक्ष भारत काळे, कार्यवाह देवराम पारीठे, सल्लागार संघटक नारायण असवले, उपाध्यक्ष सोपान असवले, धनकुमार शिंदे, श्रीनिवास गजेंद्रगडकर उपस्थित होते.

Vishwas Mehendale : दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

शिक्षक मेळाव्यास मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष निलेश काशीद व जिल्हा कार्यवाह महेश शेलार यांनी शिक्षकांच्या विविध प्रकारच्या अडचणी व समस्या शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष लक्ष्मण मखर यांनी मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांना सभासद होण्यासाठी आवाहन केले. या प्रसंगी पवना शिक्षण संकुलाच्या प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व्ही.पी.एस.प्रशालेच्या वतीने लक्ष्मण मखर यांचा सन्मान करण्यात आला. सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे नियुक्तीपत्र वाटप पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.

अध्यक्षपदावरून बोलताना गुलाबराव गवळे म्हणाले की, शिक्षकांनी काळानुसार बदल करून आदर्श विद्यार्थी घडविले पाहिजे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट् राज्य शिक्षक परिषद मावळ शिक्षकांसाठी उत्तम काम करत असल्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष श्रीनिवास गजेंद्रगडकर, सहकार्यवाह रियाज तांबोळी, संघटन मंत्री समीर गाडे, दिपक तारे, सहकोषाध्यक्ष राजकुमार वरघडे, प्रकल्प प्रमुख गणेश ठोंबरे, सोमनाथ ठुमणे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमनाथ ठुमणे यांनी तर आभारप्रदर्शन कार्यवाह देवराम पारीठे यांनी केले शिक्षक मेळाव्यास मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.