Maval : लग्नाचे आमिष दाखवून तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने 13 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष (Maval) दाखवले त्यातून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित मुलीच्या भावाला मारहाण करून शिवीगाळ केली. ही घटना फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.
राजू हरिभाऊ जाधव (रा. शिळेश्वर, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कुसगाव येथील एका शेतामध्ये चिंचा पाडण्यासाठी गेली असता आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घडलेल्या प्रकरणाबाबत कोणास काही सांगितले तर फिर्यादीच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत फिर्यादी आरोपीकडे जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत (Maval) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.