Mahavitaran transformer : मोरवाडी म्हाडा व सम्राट चौक येथील महावितरण विभागातर्फे उभारण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर हटवला

एमपीसी न्यूज : मोरवाडी परिसर हा दाट लोकवस्ती असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या भागात जास्त प्रमाणात रहदारी असते. येथे अद्यापही अंडरग्राउंड केबल झाले नव्हते तसेच चौका चौकात मोठमोठे ट्रांसफार्मर स्ट्रक्चर्स व मोठमोठ्या विद्युत केबल (Mahavitaran transformer) याचा धोका सामान्य नागरिकांना होऊ शकतो या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करून स्मार्ट सिटीच्या धरतीवर अंडरग्राउंड महावितरण केबल व ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चे काम मंजूर करण्यात आले आहे.

RPF central railway : आरपीएफ मध्य रेल्वेने 10 महिन्यांत 1236 मुलांची केली सुटका

या कामासाठी निधी उपलब्ध नव्हता तरी सातत्याने पाठपुरावा करून निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून या कामासाठी सुमारे तीन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला (Mahavitaran transformer) असून लवकरात लवकर या संदर्भातील सर्व कामकाज चालू होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांची समस्या दूर होणार आहे. सदर कामकाजामध्ये एच.टी. व एल.टी. केबल लाईन टाकण्यात येणार आहे. माजी नगरसेवक तुषार हिंगे यांच्या प्रयत्नांमुळे हा महावितरण विभागातर्फे उभारण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर हटवण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.