PCMC Encroachment : महापालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC Encroachment) वतीने शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.

अतिक्रमण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत भोंडवे कॉर्नर ते मुकाई चौक येथील रावेत बी आर टी एस रस्त्यालगत, क ई आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रात पुणे नाशिक महामार्ग मोशी टोल नाक्यापर्यंत तसेच  ड, ग, आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत वाकड स्मशानभूमी ते वाकड ब्रीज, बी आर टी एस रस्त्यालगत, आज आणि उद्या 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत आहे.

अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत भोंडवे कॉर्नर ते मुकाई चौक दरम्यान  रावेत बी आर टी एस रस्त्यालगत  क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, (PCMC Encroachment) महापालिकेचे धडक कारवाई पथक, महाराष्ट्र पोलीस दल, महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे कर्मचारी उपस्थित होते. अ आणि ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कारवाई कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई दरम्यान उपअभियंता विजय भोजने, महेश बरीदे, मनोज बोरसे, प्रवीण धुमाळ उपस्थित होते. या कारवाईत पाच जेसीबी, तीन पोकलेन वापरण्यात आले.  यावेळी अग्निशमन पथक, रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात आली होती.

Mahavitaran transformer : मोरवाडी म्हाडा व सम्राट चौक येथील महावितरण विभागातर्फे उभारण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर हटवला

क, ई आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत नाशिक फाटा ते मोशी टोलनाका दरम्यान अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली.  क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, राजेश आगळे, सीताराम बहुरे यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या कारवाई दरम्यान कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, (PCMC Encroachment) उप अभियंता सुर्यकांत मोहीते, कनिष्ट अभियंता  संदिप वैद्य, अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच  महाराष्ट्र पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा दल, रुग्णवाहिका, अग्निशमन पथक तैनाद करण्यात आले होते.  यावेळी 13 पत्राशेड, 13 टपरी, 7 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.

ड,ग, आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत वाकड स्मशानभूमी ते वाकड ब्रीज दरम्यान बी आर टी एस रस्त्यालगत कारवाई करण्यात आली. ही कारवाई  क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.(PCMC Encroachment) यावेळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा दल, रुग्णवाहिका, अग्निशमन पथक तैनाद करण्यात आले होते. आज झालेल्या अतिक्रमण मोहिमेत मुख्य रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई उशिरापर्यंत सुरु होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.