Moshi : गायत्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे सैनिकांसाठी रक्षाबंधन सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – मोशी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या गायत्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या (Moshi) विद्यार्थ्यांनी ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबवला. या उपक्रमाला संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विनायकराव भोंगाळे, विश्वस्थ सरिता विखे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमासाठी गायत्री विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका अस्मिता जाधव, योगिता अमराळे व विलास खरे या ठिकाणी उपस्थित होते.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड सायबर सेलला पोलीस ठाण्यांचे बळ

दिघी येथील नाईक सुभेदार भोला मिश्रा व हवालदार आर. पी. खोसे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे कडू-पाटील म्हणाल्या की, डोळ्यांत तेल घालून देशाचं रक्षण करणारे बहाद्दर सैनिक सणासुदीला (Moshi) आपल्या कुटुंबियांपासून लांब असतात. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजावी आणि सैनिकांविषयी असणारा आदर त्यांना व्यक्त करता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.