Moshi: केबलचालक पिता-पुत्राची महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – केबलच्या बीलावरून केबल चालक पिता-पुत्राने एका 44 वर्षीय महिलेला घरी जाऊन हाताला धरत मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) रात्री आठच्या सुमारास मोशी, प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी केबलचालक सतीष काळे आणि त्याचा मुलगा याच्यावर मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 44 वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी फिर्यादी व त्यांचा मुलगा घरी होते. सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास नागेश्‍वर या केबल नेटवर्कचा मालक सतीश काळे व त्याचा मुलाग घरी आला. केबलच्या बिलाच्या कारणावरुन फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

फिर्यादी या घरातून बाहेर आल्या असता त्यांच्या हाताला ओढून मारहाण केली. तसेच आरोपीच्या मुलाने फिर्यादी महिलेच्या मुलाला देखील मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.