Mumbai: ‘या’ फोटोशूटसाठी उर्मिला चक्क लटकली पाच तास हवेत!

हॅपी बर्थडे उर्मिला!

एमपीसी न्यूज – ‘दुनियादारी’तली मीनू, ‘असंभव’ या मालिकेमधली सोज्वळ शुभ्रा आठवतेय ?मग तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की ‘ती सध्या काय करतेय’? तर तिने म्हणजे आपल्या उर्मिला कानेटकर-कोठारे हिने आपला एक चित्तथरारक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. या फोटोशूटसाठी उर्मिला चक्क पाच तास हवेत लटकत होती. 

आज चार मे म्हणजे उर्मिला कानेटकर – कोठारेचा वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या उर्मिलाचे अभिनयाबरोबर नृत्यावर देखील प्रेम आहे. नृत्यगुरु आशाताई जोगळेकर यांच्याकडून कथ्थकचे शास्त्रीय शिक्षण घेतलेल्या उर्मिलाने आपली नृत्याची आवडही जोपासली आहे. मुलगी जिजाच्या जन्मानंतर ती आता अभिनय क्षेत्रात पुन्हा उतरली आहे. याच्या जोडीला नृत्य आहेच.अनेक वेळा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. मध्यंतरी उर्मिलाचं एक फोटोशूट चांगलंच चर्चेत आलं होतं. विशेष म्हणजे या फोटोशूटसाठी ती तब्बल पाच तास हवेत तरंगत होती. यामध्येच काही काळापूर्वी उर्मिलाने केलेल्या एरियल सिल्क याप्रकारातील नृत्याचे व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोशूटसाठी  उर्मिला चक्क पाच तास हवेत लटकत होती.

अतिशय चित्तथरारक असलेल्या या व्हिडिओंमधून उर्मिलाची नृत्याची आवड जाणवून येतेय.‘एरियल सिल्क’ हा एक नृत्य प्रकार असून उर्मिलाला नृत्याची विशेष आवड असल्यामुळे तिने या प्रकारात फोटोशूट केलं. अतिशय ग्लॅमरस असणा-या या व्हिडिओसाठी तिने फिटनेस ट्रेनर अदिती देशपांडे हिच्याकडून रितसर प्रशिक्षण घेतलं होतं.

उर्मिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेकदा ती डान्सचे, तिच्या मुलीसोबतचे किंवा तिच्या फोटोशूटचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Happy Birthday Urmila! (4 May)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.