Mumbai : मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस उद्या रद्द

एमपीसी न्यूज – मुंबईहून पुण्याला येणारी डेक्कन एक्सप्रेस उद्या (रविवार, दि.8) रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्जत पॅसेंजरही रद्द करण्यात आली आहे. 

मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम मुंबई-पुणे गाड्यांवरही झाला आहे. मुसळधार पावसामुळे उद्या मुंबईहून येणारी डेक्कन एक्सप्रेस आणि कर्जत पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे-भूसावळ पॅसेंजर दौंड मार्गे धावणार आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.