Pune : पालखी सोहळा : भिडे गुरुजी धारक-यांसह पालखीत लवकरच होणार सहभागी

एमपीसी न्यूज – स्वयंसेवकांसह भिडे गुरुजी लवकरच पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. तत्पूर्वी शहरातील जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी धारकऱ्यांना (स्वयंसेवकांना) संबोधित केले.

शहरातील जंगली महाराज रोडवर जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी धारक-यांना संबोधित केले. यावेळी मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून 500 पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. दरम्यान वारकरी धारकरी शक्ती संगम असे फलक हातात घेऊन जवळपास एक हजार धारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. नेहमीचा वाद टाळण्यासाठी यावेळी धारकरी पालखीच्या मागे चालणार आहे. 

"dharkari"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.