Pune : माउलींचा अश्व हिराचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील  दोन अश्वांपैकी एका अश्वाचे आज (रविवार) सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ही वार्ता पसरताच वारक-यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हिरा असे या अश्वाचे नाव असून श्रीमंत शितोळे सरकार यांचा हा अश्व आहे.  

हिरा हा गेल्या आठ वर्षांपासून माउलींच्या पालखी सोहळ्यात सेवा देत आहे. तो काल शितोळे सरकार यांच्यासह अंकली जि. बेळगाव येथून माउलींच्या पालखी सेवेत दाखल झाला होता. माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याबरोबरच या दोन्ही अश्वांनीही प्रस्थान ठेवले होते. त्यांनी तब्बल 30 किलोमीटरचे अंतर चालल्यानंतर पालखी सोहळ्यातच हिराने अखेरचा श्वास घेतला. हिराच्या मृत्यूने आज समस्थ वारक-यांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, माउलींच्या सेवेत लवकरच नवीन अश्व दाखल होत आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.