_MPC_DIR_MPU_III

Pune : नवचैतन्य हास्य योग परिवार जयवंतराव ससाणे उद्यान हास्य योग संघाचा पहिला वर्धापन दिन उत्साहात

एमपीसी न्यूज – घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील नवचैतन्य हास्य योग परिवार व जयवंतराव ससाणे उद्यान हास्य योग संघाचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमास विठ्ठल काटे , मकरंद टिल्लू , नगरसेवक धनराज घोगरे , महेश पुंडे , दीपक गुरुजी , प्रकाश अरगडे , नीलिमा चव्हाण, सुशीला अरगडे, माधवी अरगडे, शिला मोरे, सुमित्रा शिवलकर, सीमा वैष्णव, हेमा उणेचा, बापू देडगे, गौतम रासकर, राधेश्वर प्रसाद वर्मा , मालती भोसले, टायगर पिल्ले, वासुदेव दासवानी, धनश्री जगताप,  आदी मान्यवर व अन्य सदस्य उपस्थित होते.

यावेळी मकरंद टिल्लू यांनी हास्य या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच हास्याचे प्रकार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आधुनिक महिलांच्या मनातील जात्यावरच्या ओव्या आणि खंडेरायाचे लगीन हे नृत्य सादर करण्यात आले. नवचैतन्य हास्य योग परिवार जयवंतराव ससाणे उद्यान हास्य योग संघाचे विभाग प्रमुख प्रकाश अरगडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.