NCP : शरद पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यांना सुरुवात

एमपीसी न्यूज : प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे (NCP) आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी आज मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना शरद पवार यांचा हा निर्णय धक्कादायक ठरला आहे. त्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा. त्या पार्श्वभूमीवर राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

अशीच परिस्थिती पुण्यात देखील पाहण्यास मिळत असून पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत असल्याचे जाहीर केले आहे.

Pimpri : कविवर्य नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी काव्यजागर संमेलन संपन्न

त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित आले. शरद पवार साहेब आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्या, अशा जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील म्हणाल्या की, देशाच्या राजकारणात (NCP) शरद पवार हे सर्वोच्च स्थानी आहेत.

शरद पवार हे सत्तेमध्ये असो अथवा नसो, त्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी सर्व पक्षातील नेते त्यांना भेटत असतात. पण, आज अचानकपणे शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आमच्या सर्वासाठी धक्कादायक आहे. निवृत्त होण्याचा निर्णय साहेबांनी मागे घ्यावा. आम्हाला कायम त्यांनी मार्गदर्शन करत राहावे. हीच मागणी देशातील सर्व कार्यकर्त्यांची आहे.

जोपर्यंत शरद पवार अध्यक्षपदाच्या निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत नाही. तोपर्यंत आम्ही आमची मागणी करीत राहणार असून आम्ही सर्वजण आमच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.